Technology, Innovations, Funn, Day to Day.......!!

Thursday, December 25, 2008

आयुष्य सुखात ..............

एकदा लग्न झालं की , आपलं आयुष्य सुखात जाईल असं आपल्याला वाटत असतं...


असा वाटण्याची जागा मग ,


मूल झालं की...


मोठं घर झालं की ...


अशा अनेक इच्छांच्या अंगाने वाढतच जाते .


दरम्यानच्या काळात, आपली मुलं अद्याप मोठी झालेली नाहीत. ती जरा मोठी झाली की सारं
ठीक होईल, अशी आपण मनाची समजूत घालू लागतो.





मुलांच्या वाढत्या वयात, त्यांच्या भवितव्याच्या सुंदर स्वप्नांनी आपण आपले दिवस सजवत असतो.


मुलं जरा करती सवरती झाली की सारं कसं आनंदानं भरून जाईल, असं आपल्याला वाटत असतं .





आपला नवरा / बायको जरा नीट वागायला लागला लागली की...


आपल्या दाराशी एक गाडी आली की...


आपल्याला मनाजोगी सुटी मिळाली की ...


निवृत्त झालो की...


आपलं आयुष्य कसं सुखानं भरून जाईल, असं आपण सतत स्वतःशीच घोकत असतो.





खरं असंय, की आनंदात असण्यासाठी , सुखात असण्यासाठी आत्ताच्या वेळेपेक्षा दुसरी योग्य वेळ
कोणतीही नाही .


आयुष्यात आव्हानं तर असणार आहेतच . ती स्विकारायची आणि ती झेलता झेलताच आनंदी राहायचा
निश्‍चय करायचा हेच बरं नाही का ?





जगायला - खरोखरीच्या जगण्याला - अद्याप सुरुवात व्हायचीये, असंच बराच काळ वाटत राहतं.


पण, मध्ये बरेच अडथळे असतात. काही आश्‍वासनं पाळायची असतात , कोणाला वेळ द्यायचा असतो ,
काही ऋण फेडायचं असतं ....


आणि अगदी शेवटी कळतं , की ते अडथळे म्हणजेच जीवन होतं .





या दृष्टिकोनातून पाहिलं की कळतं ,


आनंदाकडे जाणारा कोणताही मार्ग नाही .


आनंद हाच एक महामार्ग आहे .


म्हणून प्रत्येक क्षण साजरा करा .





शाळा सुटण्यासाठी... शाळेत पुन्हा जाण्यासाठी ... वजन चार किलोने कमी होण्यासाठी ...
वजन थोडं वाढण्यासाठी... कामाला सुरुवात होण्यासाठी... एकदाचं लग्न होऊन जाऊदे म्हणून...


शुक्रवार संध्याकाळसाठी... रविवार सकाळसाठी ... नव्याकोऱ्या गाडीची वाट बघण्यासाठी...


पावसासाठी... थंडीसाठी... सुखद उन्हासाठी ... महिन्याच्या पहिल्या तारखेसाठी... आपण
थांबून राहिलेले असतो. एकदाचा तो टप्पा पार पडला की, सारं काही मनासारखं होईल, अशी
आपणच आपली समजूत घातलेली असते. पण, असं काही ठरवण्यापूर्वी आनंदी होण्याचं ठरवा.


आता जरा या पुढे दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं द्या पाहू -





१ - जगातल्या पहिल्या दहा सर्वांत श्रीमंत माणसांची नावं सांगा पाहू.


२ - गेल्या पाच वर्षांत विश्‍वसुंदरी किताब मिळवणऱ्यांची नावं आठवतायत?


३ - या वर्षीच्या पाच नोबेल विजेत्यांची नावं सांगता येतील?


४ - गेल्या दोन वर्षांतल्या ऑस्कर विजेत्यांची नावं लक्षात आहेत का?





हं! काहितरीच काय विचारताय ? असं तर वाटलं नाही ना तुम्हाला? पण, असं वाटलं नसलं तरी,
या प्रश्‍नांची उत्तरं देमं तसं सोपं नाहीच, नाही का ?


टाळ्यांचा कडकडाट हवेत विरून जातो .


पदकं आणि चषक धूळ खात पडतात.


जेत्यांचाही लवकरच विसर पडतो .





आता या चार प्रश्‍नांची उत्तरं द्या पाहू - १ - तुमच्यावर ज्यांचा प्रभाव आहे अशा तीन
शिक्षकांची नावं सांगा बरं .


२ - तुम्हाला अगदी तातडीची गरज असताना मदत करणाऱ्या तीन मित्रांची नावं सांगता येतील?


३ - आपण म्हणजे अगदी महत्त्वाची व्यक्ती आहोत , असं तुम्हाला वाटायला लावणाऱ्या एखाद -
दोघांची नावं सांगता येतील तुम्हाला ?


४ - तुम्हाला ज्यांच्याबरोबर वेळ घालवायला आवडतो अशा पाच जणांची नावं सांगा बरं .





क्षणभर विचार करा.


आयुष्य अगदी छोटं आहे .


तुम्ही कोणत्या यादीत असाल ? काही अंदाज लागतोय ?


मी सांगतो .


जगप्रसिद्ध व्यक्तींच्या यादीत तुमचं नाव नक्कीच नाहिये . पण , हा मेल ज्यांना आवर्जून
पाठवावा
ashya changlya vyakatichya friendendlist madhe tumcha nav nakki ahe....सुखात असण्यासाठी आत्ताच्या वेळेपेक्षा दुसरी योग्य वेळ कोणतीही नाही .

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home