Technology, Innovations, Funn, Day to Day.......!!

Wednesday, June 24, 2009

जुन्या.....

जुन्या अल्बम मधले फोटो पाहताना
ते दिवस किती छान वाटतात ...
आता मोठ झाल्याव कामाच्या व्यापात कुठे ती भावंड रोज रोज भेटतात ???...
कधीतरी मार्च मधे चीनूच्या वाढ़दिवसाला
भरलेल्या रोल मधले फोटो अगदी नोव्हेम्बर मद्धे
मीनूच्या वाढ़दिवसा पर्यंत काढले जायचे ...
हल्ली मात्र रोज फोटो काढतो ...
पण तरीही बाबांनी पुरुवुन पुरुवुन वापरलेल्या रोल मधले फोटो
जास्ती का प्रिय वाटतात??

त्या वेळेला बाबांनी महिन्यातून एकदा आणलेले बटाटे वडे
आज स्वतःच्या पैशांनी रोज खाल्ले तरी बेचवच का वाटतात??

पाकीटातल्या ५०० रुप्यांपेक्षा आईकडून मागुन घेतलेले २० रुपये नेहमी जास्त
मौल्यवान का वाटतात..
बाबांच्या खिश्यात हळूच सरकवलेले २०० रुपये जेव्हा त्यांना अचानक
सापडतात..
तेव्हा त्यांच्या चेहर्यावरचा आनंद पाहून अश्रु डोळ्यात दाटतात..
१०-१५ वर्षा पूर्वी ज्या बहिणीशी खुप जुनं वैर असल्यासारखे भांडायचो...

आज त्याच बहिणीचे धीराचे शब्द इतके का जवळचे वाटतात?? आज सारं काही आहे तरीही,
ते जुने दिवस आठवले की, का मनात खोल घर करून जातात..

असे हे प्रश्न फ़क्त मलाच.. की तुम्हाला सुद्धा पडतात??

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home