Mi Marathi.....
मी मराठी आहे कारण कॉलेज मधून येताना टाइमपास मंचुरियन खाऊन आलो तरी वरण भात आणि साजूक तुपाशिवाय माझं भागत नाही..
मी मराठी आहे कारण रिकी मार्टिन च्या गाण्यावर माझे पाय थिरकले तरी बाबूजींचे 'तोच चंद्रमा नभात' ऐकल्यावर नकळतच तोंडातून 'वाह' निघून जातं..
मी मराठी आहे कारण frnds सोबत cool outfits घालून धम्माल पार्टी केली तरी संक्रांत दस-याला मानचा फ़ेटा आणि धोतर घालून,तितक्याच उत्साहात नातेवाईकांच्या घरी जायला मला आवडतं..
आम्ही मराठी आहोत कारण कितीही imported cosmetics- perfumes वापरले तरी त्या typical sandal साबणा शिवाय आणि उटण्या शिवाय आमची दिवाळी साजरी होऊच शकत नाही..
आम्ही मराठी आहोत कारण वर्तमानपत्रांनी कितीही कृत्रिम रंगाविषयी लिहिलं तरी दिवसभर मनसोक्त रंग खेळल्याशिवाय एकही होळी जात नाही..
आम्ही मराठी आहोत कारण प्रवासाला जाताना गाडीतून एखादं मंदिर दिसलं की नकळतच आमचे हात जोडले जातात
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्या एक तो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी
आमुच्या मनामानात दंग ते मराठी
आमुच्या रगरगात रंगते मराठी
आमुच्या उरा उरात स्पंदाते मराठी
आमुच्या नसानसात नाच ते मराठी
आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या लहानग्यात रांगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी
आमुच्या कुला कुलात नांदते मराठी
येथल्या फुलाफुलात हासते मराठी
येथल्या दिशादिशात दाट ते मराठी
येथल्या नगानगात गर्जते मराठी
येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलतात साजते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी
येथल्या नभामधून वर्षते मराठी
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी
पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरात हाल सोसते मराठी
हे असे कितीक 'खेळ' पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी
ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता
मेघांत अडकली किरणे, हा सूर्य सोडवित होता
तशि सांजहि अमुच्या दारी, येऊन थबकली होती
शब्दांत अर्थ उगवावा, अर्थांतुन शब्द वगळता
ती आई होती म्हणुनी, घनव्याकुळ मीही रडलो
त्यावेळी वारा सावध, पाचोळा उडवित होता
अंगणात गमले मजला, संपले बालपण माझे
खिडकीवर धुरकट तेव्हा, कंदील एकटा होता
हे रक्त वाढतानाही, मज आता गहिंवर नाही
वस्त्रांत द्रौपदीच्याही, तो कृष्ण नागडा होता